Blogs

Welcome to Meraki Toy Library’s Blogs !!

टॉय लायब्ररी म्हणजे काय ?

टॉय (खेळण्यांची ) लायब्ररी ही एक अशी लायब्ररी आहे जिथे खूप प्रमाणात, विविध प्रकारची खेळणी असतात . आपण ही खेळणी ठराविक काळासाठी घरी घेऊन येऊ शकतो व आपल्या लहान  मुलांचे खेळून झाले की ती खेळणी परत करून त्याजागी नविन खेळणी घेऊन येऊ शकतो .

साधारणपणे अशा लायब्ररी मध्ये मासिक शुक्ल आकारले जाते .तसेच एक ठराविक रक्कम डिपॉझिट (deposit) म्हणून  घेतली जाते की जी सभासदत्व रद्द केल्यास सभासदला परत दिली जाते .

जसे वाचनालयातून आपण पुस्तके आणतो अगदि तसेच आपण नवनवीन खेळणी टॉय लायब्ररी मधून आणून मुलाना देऊ शकतो .

टॉय लायब्ररीचे फायदे काय आहेत ?

  1. मुलाना TV व Mobiles पासून दूर ठेवणे  ही एक कठीण बाब झाली आहे . अशावेळेस मुलाना काहीतरी productive (उपयुक्त ) मध्ये बिजी करणे आवश्यक आहे. म्हणून ही टॉय लायब्ररी. खूप सारी खेळणी कुणाला आवडत नाहीत  🙂
  2. काही टॉय लायब्ररीचा भर  शैक्षणिक (Educational) खेळणी व पुस्तकांवर असतो.त्यामुळे मुलाना खेळा बरोबर अभ्यासाची व वाचनाची आवड निर्माण होते .
  3. मुलाना इथे दरवेळेस नवनवीन खेळणी खेळावयास मिळतात .घरी आपण कितीही नविन खेळणी आणली तरीही  “नव्याचे  नउ दिवस ” ह्या म्हणी प्रमाणे मुले काही दिवसातच कंटाळून जातात आणि खेळणी बऱ्याचदा कपाटात धूळ खात बसतात .
  4. मुलाना वस्तु शेयर करायची सवय लागते .
  5. वस्तू जपून वापरणे ,त्याची काळजी करणे ही सवय लागते.
  6. शैक्षणिक (Educational ) खेळणी हाताळल्यामुळे लहान मुलाना Hand-Eye co-ordination ,Motor skills तसेच मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यास  मदत होते .

जर तुम्हाला अशी टॉय लायब्ररी ला join करायची संधी मिळत असेल तर नक्कीच त्याचा फायदा घ्या .