
गुरुपौर्णिमा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥
आपल्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आई . बोबड्या बोलांपासून ,चालणे ते पार हात धरून पाटीवर अ आ इ शिकविणारीही आईच . मनुष्याप्रमाणेच इतर पशु-पक्षांनाही आईच मार्गदर्शक असते . वाघ-सिंहाच्या बछडयांना शिकार करायला ,पक्ष्याना उडायला शिकवते ती ही त्यांची आईच.
आजपर्यंत आपण वेगवेगळ्या गुरु-शिष्यांच्या जोड्या ऐकल्या आहेत. जसे सांदिपनी ऋषी -श्रीकृष्ण, द्रोणाचार्य-अर्जुन, द्रोणाचार्य -एकलव्य. त्यात गुरुपौर्णिमा आणि एकलव्याची गोष्ट म्हणजे समीकरणच झाले आहे. पण मी इथे एक वेगळी गोष्ट सांगणार आहे . रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची.
महाराजांनी स्वामींना गुरु मानले होते. वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन ते घेत. रामदास स्वामीही त्यांना चार चातुर्याच्या ,विवेकाच्या गोष्टी सांगत असत. रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथात त्याचे अनेक दाखले आहेत. एकदा स्वामींनी महाराजांची परीक्षा घायचे ठरवले. आपण खूप आजारी आहोत.आपल्याला दमा असून त्यावरील उपाय सुद्धा भयंकर आहे.असा निरोप पाठवला. उपाय काय तर वाघिणीचे दूध .
क्षणाचाही विलंब न लावता महाराज भांडे घेऊन अरण्यात वाघिणीच्या शोधात निघाले,तेही एकटेच.रात्रीची वेळ. तिथे एका गुहेत त्यांना नुकतेच व्यायलेली वाघीण दिसली. असे म्हणतात कि वाघ,सिंहासारखे प्राणी व्यायल्यानंतर खूप आक्रमक होतात.
नुकतेच जन्मलेले बछड़े जवळ घेऊन बसलेल्या मातेला हात जोडून महाराज नम्रपणे म्हणाले “हे माते, मी तुझे दूध घेण्यासाठी इथे आलो आहे .माझ्या आदरणीय गुरूंना जो काही त्रास होत आहे त्यावरील हीच एक मात्रा आहे तरी आपण मला दूध काढून द्यावे. “
आणि चक्क त्या वाघिणीने महाराजांना दूध काढून दिले .रामदास स्वामी आपल्या दूरदृष्टीने हा सारा प्रकार पाहत होते. धन्य ते महाराज !!आपल्या प्राणांचीही पर्वा न करता आपल्या गुरुसाठी असे धाडस फक्त महाराजच करू शकतात .
शालेय जीवनातही आपण अनेक शिक्षकांच्या सहवासात येतो. कळत नकळत ते आपल्या मनावर संस्कार करत असतात .ह्याची जाणीव आपल्याला तेव्हा होत नाही पण पुढील आयुष्यात त्यांचे अनेक सल्ले आठवतात .त्यांच्या आठवणी मनात घर करून रहातात.
जसे आपण मोठे होऊ लागतो तसे आपल्या जीवनात अनेक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवत असतात . कधी मित्र-मैत्रिणी ,कधी कुणाचे ताई -दादा ,तर कधी कुणी अध्यात्मिक गुरु. पण अशा कुठल्या न कुठल्या रूपात गुरुचे दर्शन आपल्याला नक्कीच होते.
आयुष्याचे कुठलेही वळण असो. बालपण असो व वृद्धत्व . अजून एक गुरु जे कायम आपल्यासोबत असतात ते म्हणजे पुस्तके. पुस्तके ही आपल्याला कायम मार्गदर्शन करीत रहातात . पुस्तके म्हणजे अथांग ज्ञानाचा खजिना . प्रत्येक पुस्तक काही ना काही शिकवण मागे सोडतेच . त्यातून बोध कसा घ्यायचा ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. म्हणून ह्या पुस्तकरूपी गुरूंना आपल्याला विसरून चालणार नाही.
आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आयुष्यातील अशा अनेक गुरूंचे स्मरण करण्यासाठी हा लेख प्रपंच . चला तर मग सर्व गुरूंना मनोभावे वंदन करूयात आणि म्हणूयात
आचार्य देवो भवः ।।
आचार्य देवो भवः ।।
Thank you for feedback !
Very nice story…
Thank you for feedback !
Very nice ….n it’s true
Thank you for feedback !
खूप छान
Thank you for feedback !
सुंदर लेख 👌 असंच छान लिहत रहा 😊पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा श्वेता 💐
Thank you for feedback !
Nice
प्रतिक्रीयेबद्दल खूप खूप धन्यवाद